गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात खोपरा-इसापूर रस्त्यावर शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृताचे नाव महेश सुभाष शहारे (३२) असे आहे, तर जखमीचे नाव रोशन विलास पलांदूरकर (२६) आहे. मृत महेश शहारे यांची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.
घटनेच्या वेळी मृत महेश शहारे आणि जखमी रोशन पलांदूरकर खोपरा-इसापूर रस्त्यावर एम एच ३५/ए.क्यू.५८७२ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. अचानक त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे ते घसरले आणि रस्त्यावर पडले. त्यांना तातडीने तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून महेश शहारे यांना मृत घोषित केले. रोशन पलांदूरकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ही चिंताजनकच आहे. तिरोडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कार झाडावर आदळली
गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील मुरदोली बस स्थानकावर एका अनियंत्रित कारचा अपघात झाला. गोंदियाकडे जाणाऱ्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती मुरदोली बस स्थानकात एका झाडावर आदळली सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कार चा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळ च्या सुमारास घडला. अपघाताच्या वेळी वकील उदय क्षीरसागर कारमध्ये होते आणि ते थोडक्यात बचावले.
गळफास घेऊन दोघांनी केली आत्महत्या
गोंदिया तालुक्यातील रामनगर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कुडवा येथील रहिवासी चंद्रशेखर माधोराव रामटेके (६२) यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडवा परिसरातील मोक्षधामजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारदार रजत चंद्रशेखर रामटेके यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

