गोंदिया : गोंदिया जवळील दांडेगाव जंगल परिसरात पलास रिसॉर्ट येथे आपल्या मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रम आटोपून तिरोडातील व्यापारी गौरव निनावे व त्यांच्या मित्र आकाश नंदरधने हे दोघेही रात्री १२:०० च्या सुमारास पलास रिसॉर्टमधून निघाले. पण सदर रिसॉर्ट हा जंगलमार्गे असल्यामुळे ते दोघेही रात्रीच्या सुमारास मार्ग विसरले.

काही अंतरावरील जुनेवाणी या गावात दाखल झाल्यानंतर तिरोड्याला जाणारा मार्ग विचारण्याकरिता मध्यरात्री चौकात थांबलेले असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात तरुणांना त्यांनी तिरोडा जाणारा मार्ग विचारले असता त्यांना दरोडेखोरांनी गाडीच्या काच खाली करण्यास सांगून बंदुकीच्या धाक दाखवीत गौरव निनावे यांच्या डोक्याला बंदूक लावून जवळ असलेली रोख रक्कम व दागिने बळजबरी करून मागितले.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Buldhana, Motala , dabhadi robbery, wife murder ,
बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण…
Two quintals of ganja seized in Santnagari Shegaon buldhan newे
बुलढाणा : संतनगरी शेगावात दोन क्विंटल गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद

हेही वाचा – राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू

गौरव निनावे यांनी देण्यास नकार देण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका तरुणांनी जवळ असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला दरम्यान दोघांजवळ असलेले १८ हजार रुपये रोख व त्या दोघांच्या बोटात असलेल्या तीन सोन्याच्या अंगठ्या व गौरवच्या हातात असलेला चांदीच्या कडा असा एकूण दोन लाख २४ हजार ५०० रुपयांचे साहित्य व रोख लुटून नेले.

दरम्यान, या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली तर घरी येऊन दोघांना जीवानिशी ठार करण्याची धमकीही अज्ञात दरोडेखोरांनी दिली. रोख रक्कम व साहित्य हिसकावल्यानंतर सदर तीनही दरोडेखोर मोटरसायकल वर बसून जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर गौरव व आकाश यांनी मध्यरात्रीच आपल्या मित्र मंडळ व नातेवाईकांना सदर घटनेची माहिती दिली व सरळ गंगाझरी पोलीस ठाणे गाठून या संदर्भातील तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून बुधवारी सकाळच्या सुमारास या घटनेच्या तपासाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर व गंगाझरीचे पोलीस निरीक्षक वर्मा आपल्या पथकासह तसेच तपासाकरिता श्वानपथकाला घेऊन जूनेवानी या गावातील घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा – गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार

सकाळी सदर पथक तपास करीत असताना त्यांना हवेत गोळीबार झालेल्या बंदुकीचा कव्हर मिळालेला आहे. याप्रकरणी सदर तीनही दरोडेखोरांचा कसून तपास गंगाझरी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखाचे पथक तसेच श्वान पथकाच्या मदतीने केला जात आहे. गंगाझरी पोलिसांनी दरोडेखोरी करणाऱ्या तीन अज्ञात आरोपींविरुद्ध ३०९/४, ३५१/२ अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे.

Story img Loader