गोंदिया : देवरी तालुक्यातील येळमागोदी गावात मध्यरात्री झोपलेल्या मायलेकींना विषारी सापाने दंश केला. त्यांना चिचगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिचगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमळाबाई सुखीराम उसेंडी (३०) रा.येळमागोदी, मंजु सुखीराम उसेंडी (०६) रा.येळमागोदी असे मृत मायलेकींची नावे आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.

कमळाबाई व तिची चिमुकली लेक मंजु हे दोघे जवळ-जवळ झोपले होते. रात्री २ वाजता सुमारास विषारी सापाने दोघांना दंश केला. दोघींना चिचगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र कमळाबाईची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला लगेच गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मंजुवर चिचगड रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र दोन्ही मायलेकींचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Tandoba Andhari Tiger, tigress did hunting,
VIDEO : अवघ्या काही महिन्याच्या वाघिणीने केली शिकार, पण..
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

हेही वाचा – VIDEO : अवघ्या काही महिन्याच्या वाघिणीने केली शिकार, पण..

हेही वाचा – अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा

पैसे लुटणाऱ्या दोघांना अटक

देवरी तालुक्यातील सिंगंडोह वळणावर एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून बळजबरीने पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तिलोचन ईश्वरलाल पटेल आणि अवनदास ईश्वरदास माणिकपुरी अशी आरोपींची नावे आहेत.