गोंदिया : संबंधित विभाग आणि पोलीस विभाग ही अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर काहीच कारवाई करीत नाहीत म्हणून, गावातील महिलांनी चक्क कायदा हाती घेत अवैध दारू विक्रेत्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम बोरगाव/बा. येथे शुक्रवार ६ जून २०२५ दुपारी अंदाजे १:०० वाजता सुमारास घडली आहे.
ग्रामीण भागात अवैध दारूचा महिलांना प्रचंड त्रास असतो. म्हणूनच देवरी तालुक्यातील बोरगांव गावा सारखीच अवैध दारूच्या विक्रीवर लगाम लावण्याची मागणी अनेक गावात होत असते. मात्र, जेव्हा कायदाची अंमलबजावणी करणारे संबंधित विभाग त्यांचे काम नीट करत नाही. तेव्हा महिलांना अशाच पद्धतीने कायद्याची मर्यादा ओलांडून स्वतःच दारू विक्रेत्यांना अद्दल घडवावी लागते. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका अंतर्गत बोरगाव/बा. गावात नेमके तेच घडले आहे.
सविस्तर असे की,
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बोरगांव/बा. गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री विरोधात महिलांमध्ये रोष होता. गावात राजरोसपणे अवैध दारू उपलब्ध होत असून तळीराम नवऱ्याऱ्यांमुळे महिलावर्गाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच २२ मे २०२५ ला गावात महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे एक बैठक घेत, यापुढे गावात अवैध दारू विक्री होऊ दिली जाणार नाही असे ठराव घेतले होते. यावर संबंधित विभागाने ही कारवाईचं आश्वासन दिलं होता. मात्र, त्यानंतर ही गावात अवैध दारू विक्री काही थांबली नाही.
दारुवाल्यांविरोधात संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याने, अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले होते. संबंधित विभाग काहीच करत नाही हे लक्षात आल्यावर महिलांनी स्वतः गावाच्या वेशीवर निगराणी ठेवणे सुरु केले होते. आज दुपार दरम्यान भावेश कर्मकार (वय ३३) नावाचा दारू विक्रेता महिलांना दिसला. गावाच्या वेशीवर महिलांनी त्याला पकडले. त्याच्याकडे पाहणी केली असता, देशी/विदेशी दारू अशी अंदाजे किमत १९००/-रुपयेपर्यंत आवळली. त्यानंतर प्रचंड संतापलेल्या महिलांनी चक्क दुर्गेचा अवतार धारण करत या दारू विक्रेत्याला चांगलीच अद्दल घडविली. घाबरलेला दारू विक्रेता महिलांची माफी मागू लागला. पुढे असे करणार नाही असे सांगून सोडून देण्याची बिनवणी करू लागला. परंतु, महिलांनी त्याला चिचगड पोलिसांच्या स्वाधीन केले. यावर चिचगड पोलिसांनी कारवाई करीत, अवैध दारू विक्रेत्याविरोधात भारतीय न्याय संहिता (२) (अ) कलम नुसार गुन्हा नोंद केला आहे.
अवैध दारू विक्री विरोधात चिंचगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्यास आणि त्यांच्या माहितीसाठी पोलिसांना संपर्क साधण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी अवैध दारूचा वापर टाळण्यासाठी आणि याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचे मार्गदर्शन घेण्याचे तसेच अवैध धंद्याविरोधात माहिती मिळताच, चिचगड पोलीस तात्काळ नागरिकांच्या सेवेशी उपलब्ध राहील. असे आवाहन चिचगह पोलीस स्टेशन मार्फत नागरिकांना केला आहे.
“या” महिलांचा होता पुढाकार; गावाला दारू मुक्त करण्याचा केला संकल्प
अंतकला ढाले, शालू अचले, ललिता मडावी, कौसल्याबाई कुंजम, विश्वकला तुलावी, फुलनबाई पुराम, सरिता मडावी, मालन नेताम, हिना सोनटक्के, कांताबाई राऊत, भाग्यश्री मेंढे, वर्षा जांभुळकर, बबिता ब्राह्मणकर, पुष्पा राणा, तांबेकर, तांबेकर, तांबेकर, ता. वैद्य या महिलांनी पुढाकार घेऊन, तसेच सदर महिलांनी दुर्गा अवतार धारण करून अवैध दारू विक्रेत्याला मुद्दे माला सह पकडून चिचगड पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या महिलांनी गावातील पूर्णतः अवैध दारू विक्री बंद करण्याचा संकल्प केला आहे.