प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने राज्यातील सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया आयुष्य विभागाने थांबवली होती. त्याची तत्काळ दखल घेत ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा आदेश आज शासनाने काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>अकोला : राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन; साहित्यिकांची मांदियाळी

आयुष अंतर्गत भारतीय चिकित्सा प्रणालीच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे २०२३-२४ या सत्रातील प्रवेश थांबवण्याचे निर्देश केंद्रीय आयुष विभागाने दिल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. वैद्यकीय वर्तुळात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्य शासनाच्या या उदासीन धोरणाचा फटका गरजू गुणवंत मुलांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली. आज शासनाच्या वैद्यकीय खात्याने पदे भरण्याचे निर्देश अखेर दिले. आयुर्वेद व होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापकांची पदे नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>अमरावती: विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ५४ जणांची माघार, २९ उमेदवार बिनविरोध, १६ जागांसाठी होणार मतदान

संबंधित महाविद्यालयाचे अधिष्ठाता अशी पदे भरू शकतात. मानधन कमी असण्याची तक्रार होती. ती दूर करीत प्राध्यापक एक लाख, सहयोगी प्राध्यापक ८० हजार व सहाय्यक प्राध्यापक ७० हजार, असे मासिक मानधन लागू होईल.

More Stories onकॉलेजCollege
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government order to fill posts in ayurveda college amy
First published on: 05-11-2022 at 09:38 IST