लोकसत्ता टीम
बुलढाणा: काही कौतुकास्पद कामगिरी, कलेचे प्रदर्शन करणारी बातमी, व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला तर एखादी अनोळखी व्यक्ती तासातच विख्यात होते. मात्र याउलट झाले तर काय होते याचा भयावह व मन:स्ताप वाढविणारा अनुभव मेहकर येथील एका ग्रामसेवकाला आला.
लाखो कर्मचाऱ्यांच्या रोषाचे कारण ठरलेले कर्मचारी नेते विश्वास काटकर यांचा मोबाईल क्रमांक म्हणून ग्रामसेवक दीपक तांबारे यांचा क्रमांक एका महाभागाने समाज माध्यमावर ‘व्हायरल’ केला. यामुळे २१ मार्चचा दिवस ग्रामसेवक
आणखी वाचा- नागपूर : पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिला, चिडलेल्या पतीने…
तांबारे यांच्यासाठी भयावह अनुभव देणारा ठरला. काल दिवसभर त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातील संतप्त कर्मचाऱ्यांचे फोन त्यांना येत राहिले. त्यांना व त्यांच्या मोबाईलला दिवसभर उसंत मिळाली नाही. दिवसभर वाजणाऱ्या मोबाईल वर समोरचे कर्मचारी त्यांना काटकर समजून शिवीगाळ करत राहिले. अनेकांनी गंभीर धमक्या दिल्या, काहींनी ‘किती खोके घेतले साहेब?’ असे ‘रोख ठोक’ सवाल केले.
यामुळे तांबारे मी काटकर नाही, हा त्यांचा नंबर नाही असे सांगून वैतागले, थकले. फोन घेतले नाही तर त्यांच्या मोबाईल वर ‘ शिवराळ मेसेज’ चा खच पडला. तो मी नाही असे सांगून बिचारे तांबारे वैतागले. विशेष म्हणजे ते संपात ‘फुल्ल टाइम’ सहभागी झाले होते.