scorecardresearch

Premium

बुलढाणा : अन नातवंडांच्या साक्षीने आजी-आजोबा नव्याने अडकले बंधनात; प्रिवेडिंग शूटिंग, टी शर्ट, गॉगलसह धमाल कौटुंबिक सोहळा

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे नुकतेच पार पडलेला विवाह सोहळा एकदमच हटके ठरला.

grandparent remarriage Deulgaon Mahi
बुलढाणा : अन नातवंडांच्या साक्षीने आजी-आजोबा नव्याने अडकले बंधनात; प्रिवेडिंग शूटिंग, टी शर्ट, गॉगलसह धमाल कौटुंबिक सोहळा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे नुकतेच पार पडलेला विवाह सोहळा एकदमच हटके ठरला. काही मुले, व नातवंडे आपले आईवडील, आजी आजोबा यांच्यावर किती प्रेम करतात, त्यांचा आदर करतात याचे भावनिक दर्शनही यावेळी घडले. आईवडिलांचा विसर पडलेल्या स्वार्थीजणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा परिणय सोहळा ठरला.

देऊळगाव मही येथील ग्यानचंदजी कोटेचा यांनी वय वर्षे ८५ चा पल्ला गाठलेला. त्यांना आयुष्याच्या चढउतारात समर्थ साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सजनबाई या ७८ वर्षांच्या. चार सुपुत्र, सुना, नातवंडे असा मोठा खटला. पण सर्वजण ‘हम साथ साथ है’ सारखे एकत्र राहतात. त्यांच्या लग्नाला ५५ वर्षे पूर्ण झाली. मात्र, नातवंडांनी केलेल्या आग्रहामुळे या ‘रब ने बनाई जोडी’चे अगदी थाटामाटात लगीन लावण्यात आले. सजविलेले मंगल कार्यालय, मिष्टान्न, निनादणारे गाण्याचे सूर, दूरवरच्या पाचेकशे सोयऱ्यांची हजेरी, शालीनता राखून करण्यात आलेली नृत्ये, सुशोभित वाहनातून काढण्यात आलेली ‘नवरदेव’ व ‘नवरी’ची वरात असा लग्नाचा थाट होता.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा – चंद्रपूर : डिझेलसाठी पैसे नसल्याने गर्भवतीसह रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावरच

पुत्र, सुना व नातवंडांनी या जोडप्याचे पाय धुतले तो प्रसंग या दाम्पत्यासह सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. हे लग्न म्हणजे परंपरा व आधुनिकतेचा संगम ठरला. व्हिडीओ शूटिंग, ड्रोन कॅमेऱ्याने केलेल्या छायाचित्रणची जोड देण्यात आले. टी शर्ट, गॉगल, आधुनिक पेहराव करून वधू वरांचे ‘प्रिवेडिंग शूटिंग’सुद्धा करण्यात आले. लग्नात चार मुले व सुनांनी ‘ड्रेसकोड’चे पालन करीत पेहराव केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Grandparent remarriage ceremony took place at deulgaon mahi scm 61 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×