scorecardresearch

Premium

‘हे’ भाजपला महागात पडेल, रविकांत तुपकर म्हणाले ‘सर्वाधिक आमदार विदर्भात असूनही…’

विदर्भातील मुख्य पीक असलेल्या सोयाबिन, कपाशीला नगण्य भाव मिळत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

ravikant-tupkar
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

बुलढाणा : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या सोयाबिन, कपाशीला नगण्य भाव मिळत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. याचा विदर्भात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या भाजपला याचा मोठा फटका बसेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.

Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना
राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा
There are no Rohyo works in the rural areas of Buldhana district where drought-like conditions exist Buldhana
धक्कादायक! ५५० ग्रामपंचायतीत ‘रोहयो’ची कामेच नाही, मजुरांची दैना; दुष्काळसदृश्य बुलढाण्यातील चित्र
loksatta district index development in nagpur city but neglect rural areas
शहरी भागांत विकास, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; उपराजधानीत पायाभूत सुविधांचा विस्तार; संत्री उत्पादकांना फटका

आणखी वाचा-“ओजसची कामगिरी नागपूरचे नाव जगात उंचावणारी” जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना तुपकर म्हणाले, राज्यातील सोयाबीन कापूस शेतकरी आर्थिक अडचणीच्या चक्रव्युहात अडकला आहे. अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटणार आहे. मशागतीचा खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प राहणार आहे. तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे आज शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधाऱ्यांना मात्र याच्याशी काहीच घेणे देणे नाही. याचा फटका भाजपच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनाही बसणार आहे. काल नाशिक जिल्ह्यात कांदा टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांचीच वाट अडवली. त्याचप्रमाणे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Growing anger of farmers in vidarbha is not good for bjp says ravikant tupkar scm 61 mrj

First published on: 08-10-2023 at 18:07 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×