जीएसटीबाबत छोटे व्यापारी अजूनही संभ्रमित

मोठय़ा व्यापाऱ्यांची तयारी

government revenue increases in first fifteen days of gst
( संग्रहित छायाचित्र )

मोठय़ा व्यापाऱ्यांची तयारी

शनिवारपासून देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार असला तरी नागपुरातील छोटय़ा व्यापाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. काही व्यापाऱ्यांनी नव्या कर प्रणालीचे स्वागत केले असले तरी काही सावध प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

केंद्र सरकारने जीएसटी लागू करण्याची जोरदार तयारी केली आहे. नवी कर प्रणाली लागू होताच सुरुवातीला अनेक अडचणी येणार असल्याचे मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, जीएसटीमध्ये मोठय़ा व्यापाऱ्यांना अडचणी येणार नाहीत. मात्र छोटे व्यापारी ही प्रणाली समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. मोठय़ा व्यापाऱ्यांनी (आíथक उलाढाल ७५ लाखांवर) जीएसटी नोंदणी करून प्रणाली समजून घेतली. संगणकासोबतच मोबाईलमध्ये देखील जीएसटी संबंधित सर्व सॉफ्टवेअर अपलोड केले. छोटय़ा उद्योजकांना (२० लाखांपर्यंतची उलाढाल) जीएसटीपासून दूर ठेवले असले तरी उलाढालविषयक विविध विवरणपत्रांची ऑनलाईन पूर्तता त्यांना करावीच लागणार आहे. त्यामुळे छोटे व्यापारी अजूनही संभ्रमाच्या स्थितीत आहेत.  मोठय़ा व्यापाऱ्यांनी जीएसटीसाठी आवश्यक ती तयारी केली आहे. यात इलेक्ट्रॉनिक, बांधकाम, सोने-चांदी, वाहन या क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. कापड, किराणा, मोबाईल, संगणक क्षेत्रातील छोटे व्यापारी तणावात असल्याचे चित्र आहे. जीएसटीसाठी विविध सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध असून कर भरण्यासाठी ही एक सोपी पद्धत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र पूर्वी जे व्यापारी सहा-सहा महिन्यांनी कर भरत होते अथवा कर चोरी करून व्यवसाय करायचे त्यांना मात्र आता दररोज उलाढालीचा लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. यातून त्यांची सुटका नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

नव्या कर प्रणालीसाठी सज्ज

जीएसटीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सॉफ्टवेअरचा अभ्यास झाला आहे. जे व्यापारी ४० टक्के वॅट भरत नव्हते, त्यांच्यासाठी नवी करप्रणाली अडचणीची ठरणार आहे. रोजच्या उलाढालीचा तपशील तुम्हाला द्यावा लागणार असल्याने व्यापारात पारदर्शकता येईल. अनेक कर भरण्यापेक्षा एकच कर देणे सोयीचे होईल. राज्यात सोन्यावर १.२० टक्के कर होता तो आता ३ टक्क्यांवर गेल्याने दागिने महाग होतील. कारागिराचे ओझे आता अनेकांना झेपणार नाही. पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार महामंडळ

छोटे व्यापारी चिंतित

नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघटनेच्यावतीने जीएसटी काय आहे, हे कळावे म्हणून कार्यशाळा घेतल्या. त्यात छोटे व्यापारी संभ्रमात असल्याचे दिसून आले. ते जीएसटीच्या लेखाजोख्यात पडू इच्छित नाहीत. यासाठी उपलब्ध सॉफ्टवेअर सोपे आणि सरळ असून त्यामध्ये दैनंदिन व्यवहाराचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे.  प्रभाकर देशमुख, अध्यक्ष नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघटना

वाढणाऱ्या महागाईचे काय

जीएसटी मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, यामुळे महागाईचा भडका उडेल त्यासाठी सर्वसामन्य नागरिक तयार आहे का? हा खरा प्रश्न आहे. जीएसटी ही व्हॅटची सुधारित आवृत्ती आहे. एक करप्रणाली असल्याने व्यापाऱ्यांना सोयीचे होईल, परंतु त्यासाठी सर्व व्यापारी तयार आहेत का? तसेच ही प्रणाली सर्वाना कळली का हे देखील महत्त्वाचे आहे.  ए.के. गांधी, संचालक ए.के गांधी समूह

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gst goods and services tax narendra modi arun jaitley gst gst rollout in india part

ताज्या बातम्या