संपामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला ; आरोग्य विभागाच्या आज परीक्षा

एसटी महामंडळाच्या गडचिरोली, लातूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर यांसह सुमारे २५ आगारांतील वाहतूक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद आहे.

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणची एसटी बससेवा बंद असल्याने आज, रविवारी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ संवर्गाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्यातील सुमारे तीन लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

 एसटी महामंडळाच्या गडचिरोली, लातूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर यांसह सुमारे २५ आगारांतील वाहतूक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपुढे परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे असा प्रश्न आहे.

‘पेपर फुटीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ’

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड पदांसाठीची परीक्षा रविवारी (३१ ऑक्टोबर) होत आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसारख्या अफवा समाजमाध्यमांतून पसरवण्यात येत आहेत. मात्र, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आरोग्य संचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.  आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांत विविध प्रकारचे गोंधळ समोर आले आले आहेत. त्यात परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर ते ग्राह्य न धरता नवीन ओळखपत्र देण्यात येणार असल्याचा लघुसंदेश आरोग्य विभागाकडून उमेदवारांना पाठवण्यात आला होता. तसेच परीक्षेसंदर्भातील एक चित्रफित शनिवारी समाजमाध्यमांवर पसरली होती. या चित्रफितीच्या माध्यमातून ३१ ऑक्टोबरच्या परीक्षेतील पेपरफुटीची चर्चा दिवसभर समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. त्यामुळे आरोग्य संचालक कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

सुमारे तीन लाख परीक्षार्थी

आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील परीक्षेसाठी राज्यात समारे चार लाख उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे तीन लाख उमेदवारांनी परीक्षेचे ओळखपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Health department exam today akp

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या