पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार असून नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा कंदील देणार आहे. यासाठी ते विमानतळावरून नागपूर रेल्वेस्थानकावर येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे देखील भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी रेल्वेने तयारी केली असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा: पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर पावसाचे सावट

नागपूर रेल्वे स्थानकावरील २४० सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतील आणि या सर्व हालचाली रेल्वे सुरक्षा दलाच्या कक्षात दिसणार आहेत. पंतप्रधान तेथून मेट्रोने खापरी मेट्रो स्थानकावर येतील. त्यानंतर समृद्धी एक्सप्रेस वे आणि एम्सचे लोकार्पण करतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीए)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy police and cctv security for inauguration of nagpur to bilaspur vande bharat express by pm narendra modi rbt 74 tmb 01
First published on: 08-12-2022 at 11:08 IST