scorecardresearch

Premium

भंडारा, मोहाडी तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; झाडे उन्मळून पडली, घरांसह शाळेचे छतही उडाले

राज्यात मान्सून उशिरा दाखल होणार असला तरी मागील दोन दिवसांत भंडारा जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे.

Heavy rain in Bhandara
भंडारा, मोहाडी तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; झाडे उन्मळून पडली, घरांसह शाळेचे छतही उडाले (छायाचित्र -लोकसत्ता टीम)

भंडारा : राज्यात मान्सून उशिरा दाखल होणार असला तरी मागील दोन दिवसांत भंडारा जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील अनेक भागांत रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शाळा, महाविद्यालय, घरांचे शेड उडाले. अनेक घरांची हानी झाली. शेतशिवार व रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. यामुळे मोहाडी शहरातील अनेक रस्ते बंद होते. वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचेही मोठे नुकसान झाले.

हेही वाचा – आनंदवार्ता! सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

शनिवारी मोहाडी तालुक्याला गारपिटीसह वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी मोहाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वादळ, गारपिटीसह पावसाने थैमान घातले. वादळी पावसाने दहेगाव येथील वसंता खापेकर यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळले. यात घराचे मोठे नुकसान झाले तर त्याखाली दोन मोटारसायकल दबल्याने क्षतीग्रस्त झाल्या. मोहाडी तालुक्यात व परिसरात दोन दिवसांपासून वादळ, गारपिटीसह पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांसह लग्नसमारंभ असलेल्या कुटुंबाची मोठी दमछाक होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दररोज पाऊस आणि हवामानबदल तत्परतेने सूचना देण्यात येत असून नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain in bhandara and mohadi taluka ksn 82 ssb

First published on: 29-05-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×