scorecardresearch

चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू, तीन मुले जखमी

जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू, तीन मुले जखमी
(संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील पाटण, चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसादरम्यान वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर तीन मुले जखमी झालीत. सौ. वंदना चंदू कोटनाके (३५), सौ. भारुला अनिल कोरांगे (३२) अशी मृत महिलांची नावे आहेत. सायंकाळी शेतीचे काम करून पाच महिला मुलांसह घरी परत येत असताना विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. दरम्यान, वीज कोसळल्याने वंदना आणि भारूला यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मुले जखमी झालीत. जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या