scorecardresearch

Premium

चंद्रपुरात मुसळधार, अनेक भागांत पाणी शिरले; साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप

चंद्रपूर शहरात सलग दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचले. बालवीर वार्डातील अनेक घरात पाणी शिरले असून मुख्य मार्गावर आझाद बगीचाजवळ सर्वत्र पाणीच पाणी आहे.

Heavy rain Chandrapur
चंद्रपुरात मुसळधार, अनेक भागांत पाणी शिरले; साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

चंद्रपूर : शहरात सलग दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचले. बालवीर वार्डातील अनेक घरात पाणी शिरले असून मुख्य मार्गावर आझाद बगीचाजवळ सर्वत्र पाणीच पाणी आहे. शहरातील अनेक रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप आले आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजता हलक्या पावसाच्या सरी पडल्या. मात्र आकाशात ढगांची गर्दी दाटलेली होती. अशातच ११.४५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर सर्वदूर पाणी साचले. मुख्य मार्गावरील आझाद बगीचा आणि कस्तुरबा मार्गांना जलतरण तलावाचे स्वरूप आले होते. अवघ्या दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने सखोल भागात पाणी शिरले.

Threat to Futala lake
नागपूर : फुटाळा तलावालाही धोका, ३५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव
roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
Water in Kalmana
नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात
state government released information of water levels in maharashtra dams
पाणीकपातीचे संकट तूर्तास दूर; मुंबईच्या सात धरणांत ९७ टक्के जलसाठा

हेही वाचा – अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…

हेही वाचा – “हे गणराया! ओबीसींच्या मागण्या पूर्ण कर…”, गोंदियात देखाव्याच्या माध्यमातून साकडे

शहरातील राजकला टॉकीज मागील बालवीर वार्ड परिसरातून मोठा नाला वाहतो. पावसामुळे हा नाला दुथडी भरून वाहू लागला. नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आणि संपूर्ण रस्ता व हा परिसर जलमय झाला. दुचाकी व चारचाकी वाहनेदेखील पाण्याखाली आली होती. अवघ्या दीड तासाच्या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या दाव्याची पोलखोल केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain in chandrapur water entered many areas roads look like swimming pools due to stagnant water rsj 74 ssb

First published on: 21-09-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×