नागपूर : हवामान खात्याचे अंदाज सातत्याने चुकीचे ठरत आल्याने या खात्याविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत शेतकऱ्यांनी तक्रार केल्याची नोंद महाराष्ट्रात आहे. मात्र, त्यानंतरही खात्याची यंत्रणा जागी व्हायला तयार नाही. उपराजधानीत शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज खात्याला वर्तवता आला नाही. परिणामी नागरिकांना मात्र आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. शहरातील डॉप्लर रडार हा अंदाज वर्तवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

नागपूर शहरात विमानतळ परिसरात पाऊस आणि विजांचा अंदाज वर्तवणारे डाॅप्लर रडार आहे. पावसाचा अंदाज वर्तविणारे हे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांची चमूही आहे. असे असतानाही शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसाबाबत अचूक अंदाज हवामानखात्याला वर्तवता आला नाही. प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजातही कुठेही धोक्याची सूचना नव्हती. तर हलका आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली. मात्र, हा अंदाज साफ खोटा ठरला आणि ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. तब्बल चार तास शहरात विजांचे तांडव सुरू होते. तर ढगांच्या गडगडाटांनी नागरिकांची झोप उडवली. अवघ्या चार तासांत १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे अनभिज्ञ असलेले नागरिक आणि प्रशासनाची धावपळ उडाली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – ‘ऑनलाइन जॉब’ : १० हजार कमावले, पण लगेच ९२ हजार गमावले

हेही वाचा – नागपूर : पावसाचे वाढते पाणी अन मृत्यू समोर… घरातच बुडाली आजारी महिला

अद्यायावरत डॉप्लर यंत्रणा असतानाही त्याचा उपयोग खात्याला करून घेता आला नाही. पावसाळ्याचे दिवस असतानाही या यंत्रणेचा वापर करणारे तज्ज्ञदेखील नव्हते. त्यामुळे हवामान खात्याचा उपयोग काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. खाते मात्र अजूनही आमचा अंदाज योग्यच असे सांगत सुटले आहेत.

Story img Loader