scorecardresearch

Premium

विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा अधिकार! उच्च न्यायालयाचा निर्णय

मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे.

court , high court , court hammer
विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा अधिकार! उच्च न्यायालयाचा निर्णय

नागपूर : मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) मध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा २०२० साली मृत्यू झाला. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. आई आणि मोठय़ा बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, ऑगस्ट २०२१ मध्ये वेकोलिद्वारा अर्ज नाकारण्यात आला. नॅशनल कोल वेज अ‍ॅग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे कारण वेकोलितर्फे देण्यात आले. 

अर्ज नाकारल्यावर खुशबू यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. अ‍ॅड. अनिल ढवस यांनी खुशबूच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. अ‍ॅड. ढवस यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयातील आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया प्रकरणाचा दाखला देत विवाहित मुलीला नोकरी नाकारणे असंवैधानिक असल्याचे सांगितले.न्यायालयाने खुशबू यांना दिलासा देत वेकोलिला एक महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले. न्यायाधीश अविनाश घरोटे आणि न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. वेकोलिच्यावतीने अ‍ॅड. पुष्कर घारे यांनी बाजू मांडली.

kerala high court decision Custody child mother relocating abroad job
परदेशी जाण्याच्या कारणास्तव घटस्फोटित स्त्रीला अपत्याचा ताबा नाकारता येणार नाही
pardya singh thakur
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला :जखमींविषयीच्या प्रश्नांवर प्रज्ञासिंह ठाकूर भावूक
pune district office
मर्जीतील अधिकाऱ्यांवरून दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली; पुणे जिल्हा प्रशासनामध्ये अस्वस्थता
children void, voidable marriages rights to claim parents properties
बेकायदेशीर लग्नांमधून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या मालमत्तेत हक्क!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: High court decision that even married girls have right to employment on compassionate basis amy

First published on: 03-10-2023 at 04:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×