‘वेबवार्ता’ कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नागपूर : राज्यात सर्वाधिक प्राणवायू निर्मिती व साठवणूक क्षमता नागपुरात असून रुग्णालयात खाटांची उपलब्धता मुबलक आहे, असा दावा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केला. जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, महा आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वेबवार्ता-चर्चा-संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करोनाच्या दोन लाटा नागपूर जिल्ह्याने आव्हान म्हणून स्वीकारल्या. प्रशासनाने भक्कम आधारभूत सुविधा निर्माण केल्या. आज राज्यात सर्वाधिक प्राणवायू निर्मिती व साठवणूक क्षमता नागपूरची आहे.  मोठय़ा प्रमाणात खाटांची उपलब्धता आहे. तालुकानिहाय कोविड नियंत्रण कक्ष सुरू केले. सद्यपरिस्थितीत टाळेबंदीची गरज नाही. परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक जण ‘सेल्फ टेस्ट किट’ने चाचणी करतात. पण अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यास कळवत नाहीत. ही बाब टाळावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. संचालन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.

liquor
परमीट रुममधील ‘मद्य’भेसळ आटोक्यात येणार! तपासणी यंत्र खरेदीसाठी शासनाची मान्यता
Household Consumption Expenditure Survey report
विश्लेषण : दरडोई घरगुती खर्च किती वाढतो आहे?
Government promotion of local brewing industry Mumbai
स्थानिक बीअरनिर्मिती उद्योगाला सरकारची चालना
Financial crisis on sugar industry due to increase in FRP
‘एफआरपी’ वाढीमुळे साखर उद्योगावर आर्थिक संकट!

त्रिसूत्रीचा वापरा

‘मी सुरक्षित; माझे नागपूर सुरक्षित’ या प्रेरणेतून प्रत्येकाने या महामारीला तोंड दिले तर आपण सर्व या संकटातून बाहेर पडू. लसीकरण, विलगीकरण आणि जागरूकता या त्रिसूत्रीचा वापर सर्वानी करावा, असे आवाहन  जिल्हाधिकाऱ्यांनी  केले.