नागपूर : भारतातील सर्वात मोठी ब्रँडेड प्लॉटेड लँड डेव्हलपर कंपनी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) ने नागपूर शहराच्या विकासात योगदान देण्याचा निर्णय केला आहे. ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याच्या उपराजधानीत एचओएबीएलने फुटाळा तलावावर आयोजित केलेल्या आकर्षक पॅरामोटर प्रदर्शन अलिकडेच सादर केले. या अनोख्या कार्यक्रमात कंपनीने आपल्या नागपुरातील आगामी प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचे नाव ‘नागपूर मरीना’ असून शहरात पहिल्यांदाच वॉटरफ्रंट मरीना-प्रेरित जीवनशैली घेऊन येणार आहे.

या प्रकल्पात विश्रांती, उत्सव आणि मनोरंजन यांचा संगम साधणारा असेल. ४० हून अधिक जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या या प्रकल्पात नागपूरकरांना आधुनिक, शाश्वत आणि विलासी राहणीमानाचा नवा अनुभव मिळणार आहे.

४ नोव्हेंबर २०२५ रोजी फुटाळा तलावावर तिन्ही वैमानिकांनी पॅरामोटर्सवर मोठे हवाई बॅनर घेऊन नागपूरमध्ये एचओएबीएलच्या प्रवेशाची घोषणा केली. एचओएबीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी समुज्ज्वल घोष म्हणाले, महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये तिसरे सर्वात मोठे योगदान देणारे म्हणून नागपूर आता भारताच्या आर्थिक नकाशावर नव्याने झळकू लागले आहे. आमचा नागपूरमधील प्रवेश म्हणजे विलासितेची एक नवी लाट – जिथे प्रत्येक गुंतवणूक विश्वासावर आधारित आणि वारसा टिकवणारी असेल. आम्ही सुव्यवस्थित, पारदर्शक आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्याचे ध्येय ठेवतो.

भारताच्या मध्यभागी वसलेले नागपूर आता संधींनी भरलेले केंद्र बनले आहे. नैसर्गिक संपत्ती, वाढता औद्योगिक विकास, आणि स्मार्ट सिटी उपक्रमांमुळे हे शहर उच्च-गुणवत्तेच्या राहणीमानासाठी आदर्श ठरत आहे. एचओएबीएलचा ‘नागपूर मरीना’ प्रकल्प या वाढत्या चैतन्यशीलतेचे प्रतिबिंब ठरणार आहे.

कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी सौरभ जैन यांनी सांगितले, नागपूरमधील पदार्पण हे केवळ प्रकल्प लाँच नसून एक धोरणात्मक ब्रँड अनुभव आहे. फुटाळा तलावावरील हवाई प्रदर्शन हे आमच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आमचे ध्येय आहे – जमिनीला केवळ गुंतवणूक नव्हे, तर जीवनशैली म्हणून पुन्हा परिभाषित करणे.‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’चा हा उपक्रम नागपूरकरांसाठी केवळ प्रीमियम रिअल इस्टेटचा अनुभव नव्हे, तर शहराच्या भविष्यातील प्रगतीचे नवे पर्व उघडणारा ठरणार आहे. प्रत्येक उपक्रमातून मनोरंजन, जीवनशैलीला नव्याने परिभाषित करण्याची आणि आम्ही पोहोचत असलेल्या समुदायांशी आमचे संबंध अधिक दृढ करण्याची आमची कटीबद्धत आहे, असेही जैन म्हणाले.