scorecardresearch

चक्क स्मशानभूमीत रंगणार होलिकोत्सव; जाणून घ्या कुठे ते…

यावर्षीच्या लोकजागर स्मशान होलिकोत्सव कार्यक्रमात कलावंत किशोर बळी यांचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

चक्क स्मशानभूमीत रंगणार होलिकोत्सव; जाणून घ्या कुठे ते…

वर्धा : होलिका देवतेचा उत्सव अग्नीची पूजा व त्यानंतर धुलीवंदनाच्या रंगारंगात साजरा होतो. पण काही असेही आहे जे कथित भूतप्रेतांचे स्थान म्हटल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत होळीचा जागर करतात. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हा आगळा उपक्रम कुप्रथांची होळी करण्यासाठी राबविल्या जात असतो. यावर्षीच्या लोकजागर स्मशान होलिकोत्सव कार्यक्रमात कलावंत किशोर बळी यांचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर: प्रेयसीची टेहळणी आणि प्रियकर करायचा चोरी; प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात

समाजमनातून भूतप्रेतांची अवास्तव भीती व स्मशानाबाबतचा नकारात्मक दृष्टीकोन दूर करण्यासाठी अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केल्या जात असल्याचे मुख्य प्रेरक संजय इंगळे तिगावकर म्हणाले. ६ मार्चला रात्री साडे सात वाजता स्थानिक स्मशानभूमीत आयोजित या कार्यक्रमात दूरदर्शन मालिकेतील कलाकार किशोर बळी यांचा ‘हास्यबळी डॉट कॉम’ हा प्रबोधनपर मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. यापूर्वी या कार्यक्रमात तुषार गांधी, भीमराव पांचाळे, ज्ञानेश वाकुळकर, राजा आकाश व अन्य हजेरी लावून गेले आहे. सोमवारी आयोजित या आगळ्यावेगळ्या होलित्सवात सुज्ञ नागरिकांनी मित्र परिवारासह सहभागी होण्याचे आवाहन अनिस परिवारातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 16:35 IST