scorecardresearch

विदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची ‘होळी’ आंदोलन

सायंकाळी ५ वाजता शारदा कंपनी चौक येथे विदर्भ वाद्यांच्या नेतृत्वात कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी केली जाणार आहे.

विदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची ‘होळी’ आंदोलन
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आज बुधवारी शहरातील चार मतदार संघात ‘जा गे मारबत’ आंदोलन केले जाणार आहे. यावेळी कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाऱ्या नागपूर कराराची होळी करण्यात येणार आहे.

२८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करण्यात आला, नागपूर करारप्रमाणे विदर्भाला महाराष्ट्रात १ मे १९६० साली सहभागी करून घेतले, परंतु नागपूर कराराच्या ११ कलमापैकी बहुतांश कलमा पाळली गेली नाही. त्यामुळे शहरात ४ ठिकाणी कराराची होळी आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता जगनाडे चौक, सकाळी ११.३० वाजता शहीद चौक, दुपारी १ वाजता व्हेरायटी चौक तर सायंकाळी ५ वाजता शारदा कंपनी चौक येथे विदर्भ वाद्यांच्या नेतृत्वात कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी केली जाणार आहे. या आंदोलनात नागपूरकरांनी सहभागी होऊन ‘नागपूर करार’ चे दहन करण्याचे आवाहन पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 09:19 IST

संबंधित बातम्या