नागपूर : विदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची 'होळी' आंदोलन | 'Holi' protest of Nagpur agreement today by Vidarbha activists in nagpur | Loksatta

विदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची ‘होळी’ आंदोलन

सायंकाळी ५ वाजता शारदा कंपनी चौक येथे विदर्भ वाद्यांच्या नेतृत्वात कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी केली जाणार आहे.

विदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची ‘होळी’ आंदोलन
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आज बुधवारी शहरातील चार मतदार संघात ‘जा गे मारबत’ आंदोलन केले जाणार आहे. यावेळी कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाऱ्या नागपूर कराराची होळी करण्यात येणार आहे.

२८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करण्यात आला, नागपूर करारप्रमाणे विदर्भाला महाराष्ट्रात १ मे १९६० साली सहभागी करून घेतले, परंतु नागपूर कराराच्या ११ कलमापैकी बहुतांश कलमा पाळली गेली नाही. त्यामुळे शहरात ४ ठिकाणी कराराची होळी आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता जगनाडे चौक, सकाळी ११.३० वाजता शहीद चौक, दुपारी १ वाजता व्हेरायटी चौक तर सायंकाळी ५ वाजता शारदा कंपनी चौक येथे विदर्भ वाद्यांच्या नेतृत्वात कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी केली जाणार आहे. या आंदोलनात नागपूरकरांनी सहभागी होऊन ‘नागपूर करार’ चे दहन करण्याचे आवाहन पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राज्यात अतिसुक्ष्म धुलिकणांच्या प्रमाणात वाढ; प्रदूषणकारी उद्योगांचा परिणाम

संबंधित बातम्या

नागपूरात हवेतला गारठा वाढला; थंडीही वाढणार
नागपूर : रेल्वे प्रवाशांना सांताक्लॉज पावला; पुणे-मुंबईसाठी आता….
पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भाशी भाजपचा दुजाभाव
समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण
निर्दयीपणाचा कळस! पायावर पाय ठेऊन बसल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाची बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
“…म्हणूनच आम्ही अलिबागमध्ये घर खरेदी केले” रणवीर सिंगने केला खुलासा
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
उघड्या मॅनहोलची समस्या : अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार; उच्च न्यायालयानचा इशारा