लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : रविवारी रात्री बुलढाणा शहरातील जांभरुण मार्ग परिसरात एक लग्न समारंभ होता. त्यानिमित्त नवरदेवाची वरात निघाली. आता अलीकडच्या काळातील वरात म्हणजे कानठळ्या बसविणारा डीजे आलाच.

लग्नाची वरात निघाली, डीजेच्या आवाजावर सगळी वऱ्हाड मंडळी थिरकत होती. मात्र अचानकच वऱ्हाडी सैरावैरा पळायला लागली. मंडळीना वरातीतून पळावच लागलं. त्याचं झालं असं की रात्री साडेआठ च्या सुमारास जिथून वरात निघाली नेमकं तिथेच असलेल्या एका झाडावर मधमाशांच मोठे पोळं होते. डीजेचा दणदणाट आणि तीव्र कंपनामुळे मधमाशांचे पोळ ‘उठले’. चवताळलेल्या मधमाशांनी वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढवला.

आणखी वाचा-नागपूर : उपराजधानीत टोळीयुद्ध भडकले, चार तासांत दोन हत्याकांड

सगळी मंडळी सैरावैरा करत पळत सुटली. अनेकजण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाली. यामुळे लग्न सोडून त्यांना दवाखाना गाठावा लागला. सुदैवाने नवरदेवावर मधमाश्यांनी कृपा केल्याने तो बचावला. त्यामुळे शुभमंगल निर्विघ्नपणे पार पडले. या हल्ल्यात १० जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey bees attack people while wedding evening due to high volume sound scm 61 mrj