scorecardresearch

‘पोलीस कर्मचाऱ्यांना जेवण मिळाले अन्…’, उदार आतिथ्यशीलता व भोजन कंत्राटदाराची तत्परता

उदार आतिथ्यशीलता व भोजन कंत्राटदाराची तत्परता यामुळे आज रंगाचा बेरंग होता होता टळला.

akhil bhartiy marathi sahitya sammelan
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

वर्धा : उदार आतिथ्यशीलता व भोजन कंत्राटदाराची तत्परता यामुळे आज रंगाचा बेरंग होता होता टळला. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी बाहेरून पोलीस कुमक मागविण्यात आली. ते सकाळीच धडकले. वरिष्ठ त्यांचा वर्ग घेणार होते. मात्र त्यांच्या भोजनाचे काय, हा विचारच झाला नव्हता. आयोजकांनी पाहुण्यांसाठी आज रात्रीची तयारी ठेवली असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणाची  तजवीज आली.

कार्यवाह प्रदीप दाते यांनी हा सुरक्षावर्ग जरी शासकीय असला तरी ते आपल्यासाठी आले असल्याने त्यांचे भोजन आपल्याच मंडपात करण्याची भूमिका घेतली. वैष्णवी कॅटररचे मोहन मिसाळ यांना चारशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. ते पण स्तब्ध झाले पण लगेच कामाला लागले. दोनची वेळ देण्यात आली, पण वर्ग तास भरापूर्वीच आटोपल्याने गोची झाली होती. मात्र, मिसाळ यांनी तेवढ्यात भोजन तयार झाल्याची सूचना दिल्यावर आयोजकांचा जीव भांड्यात पडला. पोलीस बंधू भगिनी शांततेत जेवत असल्याचे दिसून आल्यावर दाते यांनी भोजन मंडप सोडला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:23 IST

संबंधित बातम्या