संजय मोहिते, लोकसत्ता

काही तासांनी बारावीचा निकाल लागणार आहे. हजारो विध्यार्थ्यासह पालकांची तणावपूर्ण उत्सुकता शिगेला पोहोचली असताना गणिताच्या पेपर फुटीचे केंद्रबिंदू असलेल्या सिंदखेडराजा तालुक्याचा निकाल लक्षवेधी ठरला आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात

आज दुपारी  बारावीचा निकाल जाहीर होणार असतानाच राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या गणिताच्या पेपर फुटीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटला! गणिताची प्रश्नपत्रिका ‘सोशल मीडिया’ वर सार्वत्रिक झाली. शैक्षणिक क्षेत्रासह राज्यभरात खळबळ उडाली. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात प्रकरण उचलून सरकारला धारेवर धरले होते . मात्र बोर्डाने फुटीची व्याप्ती जास्त नसून गणिताचा पेपर पुन्हा घेण्याची गरज नसल्याचा अजब खुलासा लगेच केला होता.

हेही वाचा >>> अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९२.७५ टक्के; उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात चौथे स्थान

कारवाई अन गुलदस्त्यातील अहवाल!

साखर खेर्डा पोलिसांनी शिक्षक, संस्थाचालक मिळून आठ लोकांना अटक  केली होती. या प्रकरणाची व्याप्ती लोणार तालुक्यापर्यंत गेल्याने लोणार देखील एक केंद्र बिंदू ठरले. प्रकरणाची  गांभीर्यता बघता सरकारने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेहकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या नेतृत्वात एक ‘एसआयटी’  स्थापन केली होती. परंतु या एसआयटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे . आठ आरोपी हे जामीनावर सुटले आहेत. यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार का? या शंकेने पालकही धास्तावले आहे.  एसआयटीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे आरोपी मोकळे आहे. आज बारावीचा निकाल आहे मात्र पेपर फुटी प्रकरणातील आरोपींचा निकाल कधी ….? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मुळात या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविणे काळाची गरज आहे…