नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागाने मागिल वर्षाच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. तसेच राज्यात नागपूर विभाग ८८.६७ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावरच आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता बारावीच्या निकालात मागील वर्षा १.६ टक्क्यांनी घट झाली होती. तसेच राज्यात नागपूर विभाग तिसऱ्या वर्षीही ९२.१२ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावरच होता. यंदाही म्हणजे चौथ्या वर्षीही नागपूर विभाग आठव्या क्रमांकावरच आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे.

निकाल घटण्याचे कारण काय?

नागपूर विभागाच्या निकालात २०२३-२४ मध्ये मुलांची टक्केवारी ८९.८५ टक्के होती ती यंदा ८७.४१ टक्के झाली आहे. म्हणजे मुलांच्या निकालात २.४ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मुलींची टक्केवारी २०२३-२४ मध्ये ९४.४६ इतकी होती. यावर्षी कॉपीमुक्त अभियानाचा निकालावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. विभागात कॉपी करणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. त्याचा परिणाम म्हणून निकालात काहीशी घट झाल्याची माहिती विभागीय अध्यक्षांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के, तर २०२३-२४ मध्ये ९२.१२ इतका होता होता. २०२४-२५ मध्ये निकाल ९२.१२ होता. यंदा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. त्यामुळे पुन्हा निकालात घट झाली आहे.

किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले

यामध्ये नागपूर विभागातून १ लाख ५३ हजार २५६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५२ हजार २३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.६७ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, चार वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. नागपूर विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक असतो.