नागपूर: नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात हल्ली दुपारी उन्ह तर संध्याकाळी ढग दाटून येतात. कधी कधी पाऊसही पडतो. या हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. होऊन अनेकांना आरोग्याच्याही समस्या उद्भवत आहे. हल्ली उन्हाळा सुरू असूनही अधून- मधून अवकाळी पाऊसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे दुपारी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्या बरोबर दमट हवेचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. आरोग्यविषयक बऱ्याच समस्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये अतिसार, उष्माघात, भूक मंदावणे, रक्तदाब वाढणे, ॲसिडिटी, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा, घामोळ्या येणे, ताप, सर्दी, खोकला या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घेण्यासह हलक्या वजनाचे कपडे घालणे, बाहेर पडतांना डोक्याला उन लागू नये म्हणून टोपी- गाॅगलचा वापर, शक्यतो दुपारी बारा ते तीन या वेळी बाहेर पडू नयेसह इतरही बरेच उपाय सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.