Premium

मराठा आरक्षण: मोताळ्यातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; दोघांना रुग्णालयात हलविले, आंदोलन चिघळले

मराठा आरक्षण व लाठीमारप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मोताळा येथील आंदोलकांची प्रकृती आज पाचव्या दिवशी खालावली.

buldhana
मराठा आरक्षण: मोताळ्यातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; दोघांना रुग्णालयात हलविले, आंदोलन चिघळले

बुलढाणा : मराठा आरक्षण व लाठीमारप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मोताळा येथील आंदोलकांची प्रकृती आज पाचव्या दिवशी खालावली. यामुळे दोघांना आज दुपारी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुभम घोंगटे व निलेश सोनुने अशी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या उपोषणकर्त्यांची नावे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील कोल्हे, रावसाहेब देशमुख, अमोल देशमुख, शुभम घोगटे, निलेश सोनुने, ओमप्रकाश बोर्डे यांनी ८ पासून उपोषण सुरु केले होते. आज मंगळवारी सहा पैकी वरील दोघांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. आरोग्य व प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी विनवणी केल्यावर दोघेजण उपचारास तयार झाले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करून ‘सलाईन’ देण्यात येत आहे . त्यामुळे त्यांचे कुटुंबिय व समाज बांधव आणि मोताळावासी हवालदिल झाल्याचे दिसून आले. दरम्यान हे आंदोलन चिघळल्याने जिल्हा प्रशासन देखील अडचणीत आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hunger strikers from the maratha reservation were shifted to the hospital as their condition deteriorated buldhana scm 61 amy

First published on: 12-09-2023 at 13:55 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा