नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून नागपुरातील एका व्यक्तीने मोहगाव (झिल्पी) तलावाजवळील भिवकुंड नाल्याजवळ पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल श्यामलाल बोरीकर (४५) रा. अयोध्यानगर परिसर साई मंदिरजवळ, नागपूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तो बुटीबोरी येथील निलकमल कंपनीत नोकरीला होता. त्याचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याने जानेवारी २०२२ मध्ये मध्यप्रदेशात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. तिच्यासोबत तो अयोध्यानगरात राहत होता. परंतु, काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडत होते. पत्नीच्या नेहमीच्या त्रासाला राहुल कंटाळला होता. दिवाळीला पत्नी माहेरी निघून गेली होती. हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळील भिवकुंड नाला ‘लव्हर्स पॉईंट’ म्हणून ओळखला जातो. दिवसभर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची येथे गर्दी असते. शनिवारी रात्री उशिरा गुराखी घराकडे परतत असताना नाल्याजवळ त्यांना दुर्गंधीयुक्त वास आला. यामुळे गुराख्याने जवळ जाऊन पाहिले असता जळालेला मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला.

गुराख्याने घटनेची माहिती सरपंच प्रमोद डाखळे यांना दिली. सरपंचांनी हिंगणा पोलिसांना रात्री उशिरा माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्याच्या मृतदेहाजवळ एक पिशवी आढळून आली. या पिशवीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. ‘पत्नी वारंवार धमकी देत असल्यामुळे तिच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूनंतर घटनेची माहिती आई-दादा व ताईंना देण्यात यावी,’ अशी विनंतीही केली आहे. तिघांचे मोबाईल नंबरही त्यात लिहिले आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.