scorecardresearch

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

सुधाकर डाहुले पत्नीसह महाकाली नगरीत वास्तव्याला होते. मात्र, त्यांच्या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली आणि दोघांमध्ये दररोज भांडणे सुरू झालीत.

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पडोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजा देवाडा येथील महाकाली नगरीमध्ये सोमवारी घडली.

सुधाकर डाहुले पत्नीसह महाकाली नगरीत वास्तव्याला होते. मात्र, त्यांच्या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली आणि दोघांमध्ये दररोज भांडणे सुरू झालीत. कौटुंबिक कलह वाढत असतानाच पती सुधाकर याने पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गजानन महाराज मंदिर येथील मैदानातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुधाकर डाले हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. पती-पत्नीमधील वादाचे नेमके कारण गुलदस्त्यात असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या