scorecardresearch

नागपूर: पतीने केला मुलींसमोरच पत्नीचा खून; कळमन्यातील थरारक घटना

ब्युटी पार्लर चालविणाऱ्या पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यातून त्याने दोन मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यावर होताड्याने वार करून खून केला.

crime news
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

ब्युटी पार्लर चालविणाऱ्या पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यातून त्याने दोन मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यावर होताड्याने वार करून खून केला. ही थरारक घटना कळमन्यात घडली. ललिता अमर भारद्वाज (३८, रा. मिनिमातानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती अमर विजय भारद्वाज (५०) याला अटक केली.

हेही वाचा >>>बुलढाणा: महिला दिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; जिल्हा कचेरी परिसरात पोलिसांची तारांबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर भारद्वाज हा भाजापाला विक्रीचा व्यवसाय करतो. तो पत्नीललिता आणि १४ व १२ वर्षांच्या दोन मुलींसह मिनिमातानगरात दुमजली घरात राहतो. ललिता या ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता. तिचे परपुरुषांशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय अमरला होता. त्यामुळे तो ललितावर लक्ष ठेवत होता. याच कारणावर तो पत्नीला मारहाण करीत होता. कंटाळून पती-पत्नीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ललिता या दोन्ही मुलींसह वरच्या माळ्यावर राहत होती. गेल्या काही दिवसांपासून अमर पत्नीला सोबत राहण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, ललिताने नकार दिला. त्यामुळे अमर हा चिडलेला होता. बुधवारी चार वाजता ललिता या घरी आली त्यावेळी अमर हा खाली उभा होता. त्याने तिला थांबवून वाद घातला. त्यावेळी दोन्ही मुली आईची समजूत काढत होत्या. अमरने पत्नीचा हात पकडून घरात नेले आणि हातोड्यानेे डोक्यावर वार घालून ठार केले.

हेही वाचा >>>अमरावती: दारूड्या मुलाने केली वडिलांची हत्या

साहेब…मी बायकोचा खून केला
अमरने पत्नीचा मुलींसमोरच खून केला आणि रक्ताने माखलेला हातोडा घेऊन तो थेट कळमना पोलीस ठाण्यात पोहचला. ‘साहेब…मी बायकोचा खून केला’ असे पोलिसांना सांगितले. ठाणेदार विनोद पाटील हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 23:22 IST