नागपुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १५ दुचाकी जप्त

नागपूर :  राज्यात दुचाकी टॅक्सीला शासनाची मंजुरी नसतानाही ओला, उबेर या ऑनलाइन टॅक्सी कंपन्यांकडून नागपूरसह राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये टॅक्सी सेवा सुरू आहे. उपराजधानीतील नागरिकांना धोका बघता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सोमवारी येथील दोन्ही कंपन्यांच्या सुमारे १३ गाडय़ा जप्त केल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

Return of unseasonal rains in the state
‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट

राज्यात अद्यापही दुचाकी टॅक्सीला शासनाकडून मंजुरी नाही. त्यामुळे ही दुचाकी टॅक्सी चालवणाऱ्या चालकासह ते कोणते दुचाकी वाहन वापरतात, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय यंत्रणेकडे कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या नियमबाह्य टॅक्सीचा अपघात झाल्यास प्रवाशाला होणाऱ्या हानीला कोण जबाबदार राहील, याचे उत्तर कुणाहीकडे नाही.  यात प्रवाशांचा मृत्यू वा कुणाला अपंगत्व आल्यास त्यांची भरपाई कोण करेल, हेही स्पष्ट नाही. त्यानंतरही राज्यातील बऱ्याच शहरात ओला, उबेरसह इतरही काही कंपन्या नियमबाह्यरित्या दुचाकी टॅक्सी सेवा देत आहेत. त्यातच ऑटोरिक्षा चालकांनी या सेवेला कडाडून विरोध केला आहे. नागपुरात विविध ऑटोरिक्षा चालकांच्या संघटनांनी परिवहन आयुक्तांना समस्यांचे निवेदन दिले. त्यात दुचाकी टॅक्सीवर कारवाईचीही मागणी करण्यात आली होती. त्याला काही दिवस होत नाही तोच नागपुरात ही कारवाई सुरू झाली आहे. नागपुरात कारवाई झालेल्या १३ वाहनांमध्ये दोन्ही कंपन्यांचे जवळपास निम्मे वाहन असल्याची माहिती आहे. ही कारवाई नागपूर शहरातील प्रादेशिक परिहवन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक अधिकारी हर्षल डाके यांच्या नेतृत्वात आनंद मोड, विजय राठोड, रवींद्र राठोड आणि चमूने केली.

कर्मचारीच ग्राहक 

दुचाकी टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी सकाळपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ग्राहक म्हणून टॅक्सी मागवल्या. या टॅक्सी उपराजधानीतील आर. टी. ओ. कार्यालय परिसरात येताच वाहन जप्त करण्यात आले. नोंदणी रद्द करणार : ‘दुचाकी टॅक्सी’ला शासनाची मंजुरी नसून त्यावरील प्रवासही धोकादायक आहे. त्यामुळे सोमवारी कारवाई केली. तूर्तास  सर्व १३ वाहने जप्त करण्यात आली असून पुढे त्यांची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द केली जाईल. नागरिकांनी या नियमबाह्य टॅक्सीत प्रवास करू नये, असे आवाहन नागपूर शहरातील प्रादेशिक  परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.