नागपूर : तिसऱ्या रेल्वेमार्गाचे (थर्ड लाईन) काम जलद गतीने करण्यासाठी नागपूर ते हावडा या महत्त्वाच्या आणि व्यस्त रेल्वेमार्गावर पुढील ८० तास ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यामुळे शिवनाथ एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस आणि इतर पाच गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर २० मिनिटे ते अडीच तास थांबवून ठेवण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर विभागातील चाचेर स्थानकावर तिसरा मार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ (म्हणजे ८० तासात) केले जाईल. यामध्ये कोणतीही प्रवासी गाडी रद्द करण्यात आलेली नाही किंवा इतर मार्गाने वळवली जाणार नाही. मात्र, काही गाड्यांना २० मिनिटे ते अडीच तास काही स्थानकावर थांबवून ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर : ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल…’ असा संदेश पतीला पाठवून चिमुकलीसह आईची तलावात उडी

टाटानगर-इतवारी एक्सप्रेसला गोंदिया व भंडारा येथे अडीच तास थांबवण्यात येईल. कोरबा-इतवारी एक्सप्रेसला गोंदिया व भंडारा येथे अडीच तास, निजामुद्दीन-विशाखापट्टणम एक्सप्रेसला नागपूर आणि कामठी येथे पावणेदोन तास थांबवण्यात येईल. कुर्ला-कामाख्या एक्सप्रेसला नागपूर व कामठी येथे ४५ मिनिटे थांबवण्यात येईल. इंदूर-पुरी हमसफर एक्सप्रेस नागपूर व कामठी येथे ४० मिनिटे आणि इतवारी-बिलासपूर शिवनाथ एक्सप्रेस इतवारी येथून अडीच तास विलंबाने धावणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important for railway passengers work fast at speed 80 hours mega block rbt 74 ysh
First published on: 31-01-2023 at 09:20 IST