scorecardresearch

नागपुर : भाजपच्या मंत्र्यांची संघ पदाधिका-यांसोबत महत्वाची बैठक सुरू

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर प्रथमच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपुर : भाजपच्या मंत्र्यांची संघ पदाधिका-यांसोबत महत्वाची बैठक सुरू

शिंदे सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिका-यांसोबत नागपुरात स्मृती मंदिरात महत्त्वाची बैठक सुरू आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ही बैठक बोलावली आहे. संघ आणि भाजप यांच्यातील समन्वयाबाबत चर्चा होत असल्याची माहिती आहे.

बैठकीला .भाजपकडून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. संघाचे अखिल भारतीय सहसघटन सचिव शिवप्रसाद. आणि संघ संबधित संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : शिवसेनेचा दसरा मेळावा कुणीही हायजॅक करू शकत नाही ; गद्दारांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर प्रथमच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. त्याला संघाचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला काही सूचना संघ या बैठकीत देण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Important meeting of bjp ministers with rss swyamsevak in nagpur tmb 01

ताज्या बातम्या