scorecardresearch

Premium

ओबीसींच्या मागण्यांवर ‘या’ दिवशी होणार महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होणार सहभागी

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची तत्पर दखल राज्य शासनाने घेतली आहे.

meeting on demands of OBC
ओबीसींच्या मागण्यांवर ‘या’ दिवशी होणार महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होणार सहभागी (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

वर्धा : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची तत्पर दखल राज्य शासनाने घेतली आहे. हा वर्ग नाराजीकडे वळू नये म्हणून २९ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईत सह्याद्री सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत ही बैठक असल्याचे सूचित आहे. यास खासदार रामदास तडस तसेच रामभाऊ पेरकर, विष्णूजी वखरे, साईनाथ जाधव व वसंतराव हारकळ हे विशेष निमंत्रित आहेत.

supriya sule on jayant patil cm
“अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
BJP has the upper hand on the guardian minister post
विदर्भात पालकमंत्रीपदावर भाजपचाच वरचष्मा
Women MP in Rajya Sabha Chairwomen
‘सभापती महोदया’…; राज्यसभेच्या कामकाजाची जबाबदारी महिलांवर; विधेयकाच्या चर्चेसाठी वेगळा प्रयोग
cm eknath shinde on dhangar reservation
“जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत…”, धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

हेही वाचा – ..अन् चक्क जावयाने थाटला सासूसह संसार!

हेही वाचा – ३० सप्टेंबरपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा

मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात स्थान देण्याचा मुद्दा आला होता तेव्हा खासदार तडस यांनी, आता आणखी किती समाज या आरक्षणात घुसवता, असा संतप्त सवाल जाहीरपणे केला होता. त्यांचा समावेश या बैठकीत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Important meeting to be held on on demands of obc cm deputy cm will participate pmd 64 ssb

First published on: 25-09-2023 at 12:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×