scorecardresearch

‘समृद्धी’वर भीषण अपघातात;दोन मुलांसह सहा मृत्युमुखी; भर वेगातील मोटार कठडय़ावर आदळली

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुले आणि चार महिलांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.

accident in buldhana

बुलढाणा : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुले आणि चार महिलांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.समृद्धी महामार्गावर भर वेगात असलेली मोटार कठडय़ावर आदळली. सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान हा अपघात घडला. औरंगाबाद येथून शेगाव (जिल्हा बुलढाणा) कडे जाणाऱ्या ‘इर्टिगा’ मोटारीमध्ये तेरा प्रवासी होते.

शिवणीपिसा, खळेगाव परिसरात कठडय़ाला ही मोटार धडकली. त्यात तिचा चुराडा झाला. या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह चार महिला दगावल्या. जखमी झालेल्या सात जणांवर प्रारंभी मेहकर (जिल्हा बुलढाणा) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 02:13 IST
ताज्या बातम्या