अमरावती : महायुतीतील सर्वांचा विरोध मावळला असल्‍याचा दावा भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या समर्थकांकडून करण्‍यात येत असला, तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी विरोधाचा सूर आवळला आहे. नवनीत राणा यांच्‍या प्रचार पत्रकांवर महायुतीच्‍या नेत्‍यांसमवेत संजय खोडके यांचे छायाचित्र झळकले आहे. त्‍यावर खोडके यांनी आक्षेप घेतला आहे. त्‍यामुळे नवनीत राणा यांच्‍या अडचणीत भर पडली आहे.

संजय खोडके यांनी थेट नवनीत राणा यांच्‍या नावे निवेदन पाठवून यासंदर्भात खुलासा करण्‍याची मागणी केली आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आपल्‍या प्रचाराच्या फलकांवर, पत्रकांवर माझे छायाचित्र वापरले असल्‍याचे मला समजले असून समाज माध्‍यमांवर सुद्धा प्रसारीत केले जात आहे. समाज माध्‍यमावर किंवा पत्रकांवर माझे छायाचित्र लावण्याची मला काहीही कल्पना नसून आपण माझे छायाचित्र समाज माध्‍यमांवर किंवा पत्रकांवर वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमती सुद्धा घेतलेली नाही. ही बाब निवडणूक आदर्श आंचार संहितेचे उल्लंघन करणारी आहे.

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Sanjay Raut on Chandrakant Patil Statment
Sanjay Raut : शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चांवर संजय राऊतांची रोखठोक भूमिका, चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…

हेही वाचा…बुलढाणा : सावधान! अवैध बायो डिझेलची सर्रास विक्री; ३१ हजार लिटर साठा जप्त

लोकसभा निवडणुकीत माझ्या छायाचित्राचा व नावाचा वापर करू नये, आपण माझ्या छायाचित्राचा वापर ज्या-ज्या माध्‍यमांतून केला आहे तेथून त्वरित काढून प्रसार माध्‍यमामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन समाज माध्‍यम तसेच व मुद्रित माध्‍यमांमध्ये करावे. जर याबाबत आपण माध्यमांमाधून निवेदन (खुलासा ) केले नाही तर मला कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा संजय खोडके यांनी दिला आहे. संजय खोडके आणि राणा दाम्‍पत्‍यातील वितुष्‍ट जगजाहीर आहे.

हेही वाचा…गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

संजय खोडके हे महायुतीत असले, तरी ते नवनीत राणा यांना पाठिंबा देण्‍यास तयार नाहीत. याआधी महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू यांनीही नवनीत राणांच्‍या विरोधात उमेदवार देण्‍याची घोषणा केली आहे. जिल्‍ह्यातील दोन मराठा नेते विरोधात गेल्‍याने राणा समर्थकांची चिंता वाढली आहे. महायुतीच्‍या सर्व नेत्‍यांना एका मंचावर आणू, असा निर्धार आमदार रवी राणा यांनी व्‍यक्‍त केला असला, तरी त्‍यांच्‍या अडचणी वाढत असल्‍याचे संजय खोडके यांच्‍या भूमिकेतून स्‍पष्‍ट झाले आहे.

Story img Loader