scorecardresearch

अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून १ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले

पोलीस असल्याची बतावणी करून हातचलाखीने एका व्‍यक्‍तीचे १ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्‍याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पहेलवान बाबा हनुमान मंदिरानजीक घडली.

thieves stole gold jewelery Amravati
अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून १ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले

अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून हातचलाखीने एका व्‍यक्‍तीचे १ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्‍याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पहेलवान बाबा हनुमान मंदिरानजीक घडली. या प्रकरणी प्रकाश पुंडलिकराव सुकलेकर रा. अर्जुननगर यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात दोन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश सुकलेकर हे नागपूर मार्गावर पायी फिरण्‍यासाठी गेले होते. त्यावेळी पहेलवान बाबा हनुमान मंदिरानजीक दोन लुटारू दुचाकीने त्यांच्याजवळ आले. काका सोन्याच्या अंगठ्या काढा, सोने घालून फिरू नका, मी पोलीस आहे, असे म्हणून दोघांनीही त्यांना ओळखपत्र दाखविले. त्यानंतर प्रकाश सुकलेकर यांनी स्वत:कडील तीन अंगठ्या, गोफ आणि लॉकेट असे सुमारे ४१ ग्रॅम सोन्याचे दागिने काढले. त्यावर ते सोने आमच्याकडे द्या, रुमालात बांधून देतो, अशी बतावणी त्या दोन लुटारूंनी केली. त्यामुळे प्रकाश सुकलेकर यांनी जवळील सोने त्या लुटारूंकडे रुमालात ठेवण्यास दिले. लुटारूंनी दागिने घेऊन ते रुमालात बांधल्याचे भासविले. त्यानंतर लुटारूंनी रुमाल प्रकाश सुकलेकर यांना दिला. प्रकाश सुकलेकर यांनी रुमाल उघडून बघितल्यावर त्यांना दागिने दिसले नाही.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
World Cup 2023 Updates
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

हेही वाचा – कंत्राटी नोकरभरती : सरकार खासगी कंपनीच्या घशात घालणार इतके पैसे, वाचून थक्क व्हाल…

हेही वाचा – “मस्तवाल सरकारला आपण सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय…”, कंत्राटी भरती, पेपरफुटीवरून राजकीय वातावरण तापले

दोन्ही लुटारू दुचाकीने तेथून पळून गेले. या घटनेनंतर प्रकाश सुकलेकर यांनी गाडगेनगर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात दोन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In amravati thieves stole gold jewelery worth rs 1 lakh 22 thousand by pretending to be police mma 73 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×