scorecardresearch

Premium

सैलानी दर्शन करून निघाले अन् भीषण अपघातात सापडले; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

संजय कुकाजी हाडे असे मृतक पतीचे तर रंजना हाडे असे जखमी महिलेचे नाव आहे.

buldhana husband killed in accident, sailani baba accident in buldhana, husband died wife injured in accident, buldhana two wheeler accident
सैलानी दर्शन करून निघाले अन् भीषण अपघातात सापडले; पती ठार, पत्नी गंभीर जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या वाशीम जिल्ह्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला टिप्पर(मिक्सर)ने धडक दिली. यामध्ये पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. आज शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. संजय कुकाजी हाडे असे मृतक पतीचे तर रंजना हाडे असे जखमी महिलेचे नाव आहे. गोहेगाव ( तालुका रिसोड, जिल्हा वाशीम) येथील हे दाम्पत्य आपल्या दुचाकीने सैलानी दरगाह येथे दर्शनासाठी आले होते.

हेही वाचा : अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Shiv (2)
शिव ठाकरेला VIP रांगेतून लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याची खंत, म्हणाला, “जे लोक काही तास रांगेत थांबलेले असतात…”
26-Year-Old boy Dies Of Heart Attack While Dancing At Ganesh Pandal
VIDEO: हृदयद्रावक! गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद
bhandara, man bathe river drowned river
भंडारा: अंघोळीकरिता गेला अन् नदीत बुडाला; शोध सुरू
19-year-old youth died dengue three children diagnosed Jalgaon
जळगावात डेंग्यूने तरुणाचा मृत्यू; तीन मुले बाधित

दर्शन करून परतत असताना सैलानी ते पिंपळगाव सराई दरम्यान हनुमान टेकडीजवळ त्यांच्या वाहनाला टिप्पर (मिक्सर)ने धडक दिली. यात संजय हाडे ठार झाले तर पत्नी रंजना गंभीर जखमी झाली. रंजना हाडे यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. रायपूर ठाणेदार राजपूत यांनी जखमी महिलेची भेट घेऊन सांत्वन केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In buldhana husband killed wife injured after bike hit by truck when returning after darshan of sailani baba scm 61 css

First published on: 29-09-2023 at 20:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×