बुलढाणा : विद्यार्थ्यांची नियमित वाहतूक करणाऱ्या ‘पिकअप’ वाहन आणि बुलेट मध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एक जन ठार तर चौघे जखमी झाले. बुलढाणा देऊळघाट मार्गावरील निवांत हॉटेलच्या परिसरात हा अपघात घडला. बुलढाणा नजिकच्या देऊळघाट येथील विद्यार्थी बुलढाणा शहरातील मधील विविध शाळांमध्ये शिकतात. ते शिकत असलेल्या विविध शैक्षणिक संस्था पासून बुलढाणा बस स्थानक बऱ्याच अंतरावर आहे. त्यातच शहर बस वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. यामुळे विध्यार्थ्यांना शाळा ते बस स्थानक आणि नंतर देऊळघाट असा अडचणीचा प्रवास करावा लागतो.
ही अडचण लक्षात घेता काही वाहनधारकांनी विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर थेट शाळेतून देऊळघाट येथे त्यांच्या घरी पोहोचण्याचे काम सुरु केले आहे. त्यातीलच एका पीकअप वाहनाचा सोमवारी संध्याकाळी अपघात झाला. आठ विध्यार्थ्यांना घेऊन देऊळघाट ( तालुका बुलढाणा ) कडे जाणारे वाहन आणि सुसाट वेगातील बुलेट यांची धडक झाली. यात बुलेटवर स्वार रियाज बेग जफर बेग (वय ३८ वर्षे,राहणार देऊळघाट आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसुफ (वय ३८ राहणार शेंदुर्णी जामनेर, जिल्हा जळगाव ) दोघेही गंभीर जखमी झाले. त्यातील मोहम्मद तौसिफ याचा मृत्यू ओढवला झाला.
गंभीर जखमी मोहम्मद तौसिफ हा देऊळघाटला आपल्या मामा ला भेटण्यासाठी आला होता. दरम्यान या अपघातात पिकअप वाहनातील महेश गणेश कानडे, रुद्र गजानन कटक, राजश्री शिवा माळोदे आणि शेजल शंकर कटक हे चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमीना जखमींना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र राठोड तातडीने आपल्या पथकासह रुग्णालयात दाखल झाले . चिंतित पालकांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. जखमीची प्रकृती ‘स्थिर ‘ असल्याचे जिल्हा रुग्णालय सूत्रांनी आज मंगळवारी सांगितले.

