चंद्रपूर: कठोर परिश्रमाअंती यश मिळते असे म्हणतात. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी शार्टकट नसतोच, त्यासाठी प्रचंड परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. सोबतच कमालीचा संयम,अनं अयपशासोबत दोन हात करण्याची ताकद जोडीला असावी लागते. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेल तर यशाला कोणीच रोखू शकत नाही. चंद्रपूर जिल्हयातील चर्तुभूजम नागापुरे या शेतकऱ्याच्या मुलाने प्रचंड परिश्रम घेत हे सिद्ध करून दाखविले आहे. चतुर्भुजम हा मद्रास येथील प्रतिष्ठीत भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिक सहायक अधिकारी. पदावर रूजू होणार आहे. आपल्या पोरान मिळविलेल्या या यशान भारावलेल्या आईवडिलांनी अनं मित्रपरिवाराने त्याचं गावात जंगीच स्वागत केल.
चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी या तालुकास्थळालगत असलेल्या खराळपेठ येथील चर्तुभूजम मनोहर नागापुरे या तरूणाच्या यशाचा हा प्रवास थक्क करणारा आहे.खराळपेठ या लहानशा गावात त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं. यानंतर गोंडपिपरी येथील जनता विद्यालयातून त्याने बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली. शहरात जाउन पदवीचे शिक्षण घेण्याची संधी असतांना देखिल चर्तुभूजम ने गोंडपिपरी येथील चिंतामणी महाविद्यालयातून बि.एससी पूर्ण केली.नंतर तो थेट नागपूरात गेला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून त्याने एमएससी यशश्वीरित्या पूर्ण केली. यानंतर चर्तुभूजमने पिएचडी करण्याचे ठरविले.
दरम्यान हे शिक्षण सुरू असतांनाच मद्रास येथील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिक सहायक अधिकारी पदाकरिता जाहिरात निघाली. चर्तुभूजम ने या परिक्षेकरिता अर्ज केला.प्रचंड परिश्रम घेतले.काल या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यात चर्तुभुजने बाजी मारली.आता तो मद्रास येथील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये वैज्ञानिक सहायक अधिकारी म्हणून रूजू होणार आहे. आपला मुलगा देशातील नामवंत रिसर्च सेंटरमध्ये अधिकारी होणार हि माहिती समजताच आईवडिलांना भरून आलं. गावातील मित्रमंडळी व आप्तेष्टांनी त्याच गावात आगमन होताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला. मनात जिदद अनं कठोर परिश्रमाची तयार असली कि यश आपण खेचून आणू शकतो हे चर्तुभूजम ने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले.अतिशय ग्रामीण भागातून शिक्षण घेत चर्तुभूज ने मारलेली मजल आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आई-वडिल करतात शेती
मनोहर नागापूरे व सुलता नागापूरे हे चर्तुभूजचे आईवडील आहे.त्यांना खराळपेठ येथे सात एकर शेती आहे.ते दोघेही शेती करतात.मनोहर नागापूरे हे पोलीस दलात कार्यरत होते.काही वर्षापूर्वी ते निवृत्त झाले.अतिशय प्रामाणीक अनं कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची पोलीस दलात वेगळी ओळख होती.त्यांना एकून तीन मुले आहेत.चर्तुभूजम सर्वात लहान आहे.मुलाने मिळविलेल्या या यशानंतर आईवडिलांनी आंनद व्यक्त केला आहे.