चंद्रपूर : उन्हाळ्यात लागणारा आंबा चक्क पावसाळ्यात आल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली असून यामुळे सर्वत्र कुतुहल व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यात लागणारा आंबा हा पावसाळ्यात लागण्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला आंब्याच्या झाडाला बहर येतो, मग फळ येण्यास सुरूवात होते. मात्र, सिस्टर कॉलनी नगिनाबाग परिसरात अजिंक्य कुशाब कायरकर यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला चक्क पावसाच्या दिवसांमध्ये आंबे लागले आहेत. झाडाला पावसाळ्यात आंबे लागल्यामुळे सर्वत्र कुतुहल व्यक्त होत आहे. आंब्याच्या झाडाला मार्च महिन्यामध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यात हळूहळू आंबे लागतात. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी वातावरणात बराच बदल झाला. ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती झाली होती. जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. मध्यतंरी पावसाने अनेक दिवस उघडीप घेतली. त्यामुळे वातावरणात मोठा बदल होवून प्रचंड ऊन, गर्दी व साथींच्या रोगांचे प्रमाण वाढले होते. या वातावरण बदलाचा फरक फळझाडांवरसुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील या बदलामुळे सीझन नसताना आंब्याच्या झाडाला आंबे लागल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२३ या वर्षामध्ये जागतिक वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या बदलाचा सूक्ष्म अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. हा बदल भविष्यासाठी चिंताजनकही ठरू असू शकतो असे तज्ञांनी सांगितले.

Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
boiled water during monsoon
Health Special: पावसाळ्यात कढवून आटवलेले पाणीच का प्यावे?
childhood, fear, rural life, resilience, thunderstorms, snakes, farming, education, marriage, societal expectations, economic uncertainty
‘भय’भूती : भयकातर हिरवे हुंकार
Sitopaladi benefits uses for cold and cough Ayurveda herb monsoon viral illness
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे
Drinking milk and jaggery before bed This Ayurvedic combo
रात्री झोपताना तुम्हालाही दूध पिण्याची सवय आहे का? मग १५ दिवसातून एकदा अशा प्रकारे करा दुधाचे सेवन; जाणून घ्या डॉक्टरांचे मत

हेही वाचा – वर्धा : नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गळा आवळून खून, प्रियकरावर संशय

हेही वाचा – नागपूर : केअर रुग्णालयातील ७० रुग्ण इतरत्र हलवले; पावसाचा तडाखा, धावाधाव

दरवर्षी आमच्या घरच्या आंब्याच्या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे लागायचे. हे झाड आता २० वर्षांचे आहे. मात्र, यावर्षी भर पावसात आंबे लागले असून ते पक्वही झाले आहेत. वातावरणाच्या बदलामुळेच असे झाले असावे. – अजिंक्य कुशाब कायरकर