नागपूर : नागपुरातील बदनाम वस्ती अशी ओळख असलेल्या गंगाजमुना वस्तीत येणाऱ्या काही आंबटशौकिनांना पोलीस पकडतात. त्यांना चौकीत नेऊन मारहाण करतात. कुटुंबीयांना सांगण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वसुली करतात. त्यासाठी साहिल नावाच्या पानठेला चालकाच्या खात्यात पैसे टाकण्यास भाग पाडतात,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाजमुना वस्तीत जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त वारांगना देहव्यापार करतात. त्यांच्याकडे शहरातील, बाहेर राज्यातील ग्राहक येतात. अनेकदा त्यांचे पैसे हिसकावून घेतले जातात. त्यामुळे ग्राहक गंगाजमुना चौकीत तक्रार करतात. अशा प्रकरणात पोलीस उलट फिर्यादीलाच मारहाण करतात. बदनामीचा धाक दाखवून मध्यस्थाच्या खात्यात पैसे टाकायला सांगतात. त्यानंतर संबंधित वारंगणाकडून ग्राहकांचे पैसे वसूल करुन स्वत:च हडपतात.

Nagpur Police starts vasuli from sellers
नागपूर पोलिसांकडून वसुलीचा ‘नाईट पॅटर्न’…. रस्त्यावरचे दिवे मालवून…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Mumbai police arrest four Lawrence Bishnoi gang members
लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई
satara crime news
सातारा: रक्कम लांबविण्याचा बनाव पोलिसांकडून उघडकीस
Pune Rural Police arrested 21 illegal Bangladeshi nationals in Ranjangaon Industrial Colony
पिस्तुलांची तस्करी रोखण्याचे आव्हान
house owner kidnap island
पिंपरी : पर्यटनाच्या बहाण्याने नारळ पाणी विक्रेत्याकडून खंडणीसाठी घरमालकाचे विमानाने अपहरण; बेटावर डांबले
nagpur city police bust sex racket at hotel oyo
दिल्ली-मुंबईच्या मॉडेल तरुणी; नागपूरचे ओयो हॉटेल अन् देहव्यापार…
Two and half months after illegal timber transport case forest officials remain confused about action
वनविभागात चोर सोडून संन्याशाला फाशी !

हे ही वाचा…आमदार राजकुमार पटेल ‘प्रहार’ सोडणार?… बच्‍चू कडू स्‍पष्‍टच बोलले….

हे चौघे ग्राहकांना हेरतात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील सुखदेव, शकील, केशव, मुकेश हे चौघे ग्राहकांना हेरतात व पोलीस कर्मचाऱ्यांना टीप देतात. अशा ग्राहकांना पोलीस पकडून चौकीत आणतात. त्यांना मारहाण करुन साहिल या पानठेला चालकाकडे पाठवतात. त्याच्या पानठेल्यावरील ‘क्युआर कोड’वर ‘ऑनलाईन’ पैसे टाकण्यास बाध्य करतात. त्यानंतर साहिलकडून ते पैसे रोख स्वरुपात परत घेतात. साहिल आणि चौकीत तैनात कर्मचाऱ्यांचा बँक खात्याचा तपशिल काढल्यास पोलिसांची वसुली उघड होईल, असा दावाही सूत्रांनी केला.

चौकीत सीसीटीव्ही नाहीत

सुखदेव, शकील, केशव, मुकेश हे मित्रांना आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रीच्या सुमारास गंगाजमुना चौकीत बोलावतात. तेथे नेहमी दारु पार्टी होते. तसेच गंगाजमुनातील वारांगणांकडून हातपाय चेपून घेण्याचा नवीनच प्रकार चौकीतील पोलिसांनी सुरू केल्याची चर्चा आहे. परंतु, या पोलीस चौकीत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांचा हा प्रताप समोर येत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गांगजमुना वस्तीत येणाऱ्या ग्राहकांची वाहे रस्त्यावर उभी असतात. त्या वाहनाच्या डिक्की फोडून पैसे आणि वस्तू चोरी केल्या जातात. चोरीची तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तींना पोलीस कर्मचारी दमदाटी करतात. त्याला आल्यापावली परत पाठवतात, असाही आरोप आहे.

हे ही वाचा…पोटच्या लेकींना पित्याने नदीत फेकले

कारवाई करू -ठाणेदार

गंगाजमुना चौकीत पोलीस कर्मचारी ग्राहकांकडून वसुली करतात, अशा तक्रारी आमच्याही कानावर आल्या आहेत. जर कुणी असे गैरकृत्य करीत असतील तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.- हेमंत चांदेवार, ठाणेदार, लकडगंज पोलीस ठाणे.