गोंदिया : गोंदिया वनविभागातील दासगाव बीट/गोंदिया वनपरिक्षेत्रा मधील कोहका – भानपुर परिसरात (कक्ष क्र- १०२० , गट न. ३१२.) वाघाचा मृतदेह आढळला आहे. मंगळवारी सकाळी स्थानिकांना सदर वाघ मृत अवस्थेत आढळला, स्थानिकांनी माहिती वन विभाग व संस्थेला दिली. घटनास्थळी चमू पोहचून स्थळाची पाहणी करण्यात आली.

हा नर वाघ ‘टी १४ वाघिनी’चा अंदाजे २० महिन्याचा बछडा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. टी १४ वाघीण आपल्या बच्यांना घेवून नागझिराच्या पूर्व भागात राहायची. काही दिवसांआधी हा नर बछडा दुसऱ्या मोठ्या नर वाघाच्या भीतीने वेगळया क्षेत्रात स्थलांतर झाल्याचे समजले होते. स्थळाची संपूर्ण पाहणी करून शवविच्छेदन करीता मृत वाघाला कुडवा येथील वन विभागाच्या वन उद्यान परिसरात आणून शव विच्छेदन करण्यात आले. प्रथमदर्शी वाघ इन्फेक्शनने मृत झाल्याचे निदर्शनात आले असून वाघाचे अवयव पुढील तपासाकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
dead leopard found in wheat field in Nimbhore Phaltan causing excitement
फलटण परिसरात मृत बिबट्या आढळला, जिल्ह्यात महिनाभरातील चौथी घटना
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !

हेही वाचा : एसटी बँक लाच प्रकरणात महत्वाची अपडेट… तर घबाड बाहेर येईल

घटनास्थळी प्रमोद पंचभाई उपवसंरक्षक गोंदिया, प्रीतमसिंघ कोडापे विभागीय वनअधिकारी दक्षता,योगेंद्र सिंघ सहाय्यक वनसंरक्षक, सावन बहेकार मानद वन्यजीव रक्षक, सचिन डोंगरवार सहाय्यक वनसंरक्षक, अपर्णा पाटील सहाय्यक वनसंरक्षक, दिलीप कौशिक वनपरिक्षेत्र अधिकारी , तहसीलदार श्रीकांत कांबळे, अनिल दशेरिया, नॅशनल टायगर कन्सर्वेशन प्रतिनिधी, मुकुंद धूर्वे, रुपेश निंबार्ते, संतोष श्रीवास्तव वनपाल,पोलिस विभागाकडून पोलिस निरीक्षक ढाले, संजय तेकाम, संस्थांकडून सेवा संस्थेचे सुशील बहेकार, डीलेश कुसराम व संपूर्ण वनविभागाच्या चमुने घटनास्थळी पोहचून शहानिशा केली. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

मात्र, वनखात्याचे पथक व स्वयंसेवी घटनास्थळी पोहोचले असून ते वाघाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहे. शव विच्छेदन पशू वैद्यकिय अधिकारी देवेंद्र कट्रे, मेघराज तुलावी, कृपान युइके यांनी सर्व पार पाडले व कुडवा वनक्षेत्रात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे

वन विभागाचा निष्काळजीपणा

कोहका-भानपूर मार्गावर झालेला वाघाचा मृत्यू हा वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे गावातील ग्रामस्थांचा आरोप आहे. बुधवारी (८ जानेवारी) निलागोंडी गावातील सरपंच पती जगदीश लिल्हारे यांनी वनपाल संतोष श्रीवास्तव यांना सदर वाघाबद्दल एका गुरख्यानी त्यांना माहिती दिली असल्याचे तसेच वाघ हा आजारी असल्याचे सांगितले होते. पण, या बाबतची माहिती वरिष्ठांना त्यांनी कळविली नसल्याने वाघाच्या आजारात वाढ होवून मृत्यू झाली असल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader