नागपूर : कुही तालुक्यातील पाचगावमध्ये असलेल्या सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर एका रंगारंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १३ तरुणी तोकड्या कपड्यात अश्लील नृत्य करीत होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिसॉर्टवर छापा घातला. या छाप्यात अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले तर २४ मद्यधुंद आंबटशौकींना अटक करण्यात आली. पोलिसांनी विदेशी दारुसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे आंबटशौकीन असलेल्या धनाढ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कुही तालुक्यात पाचगामध्ये सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट आहे. या हॉटेलचा मालकी हक्क राजबापू मुथईया दुर्गे (रा. नागपूर) याच्याकडे आहे. तर विपीन यशवंत अलोने (जगनाडे चौक, नागपूर) हा व्यवस्थापक आहे. या हॉटेलवर अश्लील नृत्य करण्यासाठी आरोपी भूपेंद्र ऊर्फ मॉन्टी सुरेश अणे (रा. रामटेक) हा तरुणींना करारपद्धतीने आणतो. गेल्या अनेक दिवसांपासून या हॉटेलमध्ये जवळपास २० तरुणी रात्रीच्या पार्टीत तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करून आंबटशौकीन ग्राहकांचे मनोरंजन करतात. तर ग्राहक नृत्य करणाऱ्या तरुणींवर पैसे उधळतात. या अश्लील नृत्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे यांनी पथकासह रविवारी मध्यरात्री छापा घातला. यावेळी अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींवर जवळपास २४ ग्राहक पैसे उधळून ताल धरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी डीजे बंद करून विदेशी मद्यासह ४८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा… यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक
हेही वाचा… Video : खामगावात कथित ‘गजानन महाराज’ प्रगटले! तोतया की बहुरुपी?, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…
अभय वेंकटेश सकांडे (वर्धा),अतूल ज्ञानेश्वर चापले (मोठी अंजी, वर्धा), शुभम ओमप्रकाश पवनीकर (जुनी मंगळवारी, नागपूर), विशाल माणिकराव वाणी (जुनोना, वर्धा), आशिष नत्थूजी सकांडे (गांधीनगर, वर्धा), हर्षल भाऊराव माळवे (वर्धा), विजय सदाशिव मेश्राम (तीगाव, वर्धा), प्रवीण महादेवराव पाटील (मसला, वर्धा), अशोक तुकाराम चापडे (गजानननगरी, सेलू, वर्धा), कौसर अली लियाकत अली सईद(केळझर, वर्धा), प्रशांत ज्ञानेश्वर घोगडे(जुना पाणी ,वर्धा) प्रवीण रामभाऊ बिडकर (रा रोठा,वर्धा), सतीश उध्दवराव वाटकर (हिंगणी, वर्धा), गजानन रामदास घोरे(पिंपळगाव, ता. बाळापूर, जि. अकोला), महेश महादेव मेश्राम(झडशी,वर्धा), गोविंद जेठालाल जोतवानी (साई मंदिरजवळ, वर्धा), राकेश विठ्ठलराव भांडेकर(खापरी वॉर्ड २, वर्धा), अविनाश शंकरराव पंधराम (बोरखेडी, वर्धा), आकाश किसनाजी पिंपळे (झडशी, वर्धा), राजेश रमेश शर्मा(दयाळनगर, अमरावती), संजय सत्यनारायन राठी (प्रतापनगर, वर्धा) अशी अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणींवर पैसे उडविणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर, चंद्रशेखर गाडेकर, ज्ञानेश्वर राऊत, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, मयूर ढेकले, दिनेश अधपूरे, विनोद काळे, भूरे, भोयर, शेख, अमृत किंनगे, रोहन ढाखोरे, महिला पोलीस नाईक वनिता शेंडे, कविता बचले, आणि राकेश तालेवार यांनी केली.