नागपूर : खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीत एका तेरा वर्षीय मुलाने तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना २४ सप्टेंबरला घडली. घटनेची माहिती पुढे आल्यावर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरच्या दुपारी पीडिता मैत्रिणीसह खेळण्यासाठी आरोपीच्या घरी गेली. येथे आरोपीची आजी स्वयंपाक करत होती. आरोपीने मुलीला शेजारच्या खोलीत नेले. येथे त्याने मुलीवर बलात्कार केला.
हेही वाचा : नागपुरातील पूरबळींची संख्या पाचवर




यानंतर मुलगी रडत घरी गेली. तिच्या आईने आस्थेने चौकशी केली असता तिने घडलेली माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी खापरखेडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या तक्रारीवरून १३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले.