नागपूर: अभिनेते नाना पाटेकर यांची गणना फिल्म इंडस्ट्रितील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. अभिनेता असण्यासोबतच नाना पाटेकर एक लेखक आणि चित्रपट निर्मातेदेखील आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी नाना यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री सारख्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रसिद्ध नाना पाटेकर त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी आणि जबरदस्त डायलॉग डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध आहेत, पण तुम्हाला त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर बद्दल माहिती आहे का? सध्या तो नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचे काम करतो आहे. सोमवारी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-२ चा समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मल्हार पाटेकर यांनी उपस्थिती सर्वांच्या आकर्षणाचे कारण ठरले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला जातो. परंतु, यावर्षीपासून संघाकडून तृतीय संघ शिक्षा वर्ग अशा नावाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग -२ असे नाव असणार आहे. १६ मे पासून रेशीमबाग परिसरात या वर्गाला सुरुवात झाली असून देशभरातील ९३६ स्वयंसेवक या वर्गात सहभागी झाले होते. या कार्यकर्ता वर्गाचा समारोपीय सोहळा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर झाले. यावेळी श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला छत्रपती संभाजीनगरचे पीठाधीश रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वयंसेवकांना उद्बोधन केले. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी मल्हार पाटेकर यांच्या परिचय करून देण्यात आला. त्यांची उपस्थिती सर्वांसाठी आकर्षणाचे कारण ठरली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : भाजपने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यावरून नाना पटोलेंची टीका, निकालाचे फेरमूल्यांकन करा

मल्हार पाटेकर यांनी ओळख

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर आधीपासूनच अत्यंत साधे आयुष्य जगतो. मल्हार याने मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण घेतले मल्हार याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. मल्हारला लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची आवड होती. पण मल्हार याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले. मल्हार दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमाच्या माध्यमातून सिनेविश्वात पदार्पण करणार होता. पण नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यात वाद झाल्यानंतर नाना यांनी मल्हार याला सिनेमात काम करण्यास नकार दिला. सध्या मल्हार नाम फाउंडेशन चे काम करतो आहे.

Story img Loader