नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाखतीची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्सवर ही चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रदेश काँग्रेसने देखील ही चित्रफीत एक्सवर प्रसारित केली. परंतु, ही चित्रफीत चुकीची असल्याचा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हेही वाचा : नवरी मिळेना, तरुणांचे मानसिक खच्चीकरण; नोकरी अन् अपेक्षांमुळे रेशीमगाठी लांबणीवर !

तसेच याबद्दल काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठविल्याचे सांगितले. ते आज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपच्या आगामी कार्यक्रमाची माहिती देताना बावनकुळे म्हणाले, ४ मार्चला नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा संबोधित करतील. ६ मार्चला राज्यातील सर्व २८८ विधानसभांमध्ये ५ हजार महिलांच्या उपस्थितीत नारीशक्ती वंदन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करतील.