नागपूर: सोयाबीन पिकावर सध्या ‘येलो मोझेक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरवर्षी या रोगाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामागचे नेमके काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले व त्यावर काय उपाययोजना करता येईल, याची माहिती जाणून घेतली.
यावेळी डॉ. पंजराबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. विनोद राऊत, प्रा.डॉ. मिलिंद राठोड, प्रा.डॉ. हरीश सवाई, प्रा. डॉ. मोहन पाटील उपस्थित होते. सध्या संत्रा, मोसंबी व भाजीपाल्यावर नवनवीन रोग येत असल्याने त्यावर काय उपयोजना करता येईल यासाठी एका कार्यशाळेचे नरखेड येथील बाजार समीतीमध्ये आयोजन करण्यात आले होते. यात सोयाबीनवरील येलो मोझेकचा विषय निघाला.
हेही वाचा… गोंदिया: जीव मुठीत घेत पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास!
गेल्या काही वर्षापासून येलो मोझेकमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान का होते, यावर तज्ज्ञ मंडळीसोबत अनिल देशमुख यांनी चर्चा केली.