scorecardresearch

नागपूरमध्ये ‘शिक्षक’ मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाहीच, परिषदेच्या गाणार यांना पाठिंबा

भाजपने या जागेवर उमेदवार न देता शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा दिला.

नागपूरमध्ये ‘शिक्षक’ मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाहीच, परिषदेच्या गाणार यांना पाठिंबा
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडून जाहीर झाल्यापासून भाजप यावेळी या मतदारसंघातून उमेदवार देणार का याबाबत असलेली उत्सुकता खेर बुधवारी संपली. भाजपने या जागेवर उमेदवार न देता शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा दिला.

हेही वाचा >>> नागपूर : अशोक चव्हाणांच्या अनुपस्थितीची चर्चा

गाणार यपूर्वी या मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेले आहेत. दोन्ही वेळा त्यांना भाजपचा पाठिंबा होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार देईल व त्यासाठी पक्षांच्या शिक्षक आघाडीच्या नेत्याला संधी देईल अशी चर्चा होती. एक प्रकारे गाणार नकोच अशी भूमिका भाजपच्या शैक्षणिक आघाडीवी होती. पक्षात दीर्घ काळ यावर चर्चा झाली. दरम्यान भाजपकडून होणाऱ्या दगाफटक्याची चाहुल लागताच शिक्षक परिषदेने गाणार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपने आज गाणार यांना पाठिंबा जाहीर करून संंभ्रम संपवला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 12:45 IST

संबंधित बातम्या