नागपूर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून केली आहे. सुरेश भट सभागृहात राहूल गांधी संविधान संमेलनाला मार्गदर्शन करताना राहूल गांधी म्हणाले, संविधान स्वातंत्र्याच्या लगेच काढण्यात आले असा आरोप होतो. परंतु संविधानामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, भगवान बुद्ध अशा सर्वांचे विचार आहेत. संविधानामध्ये हजारो वर्षांपासून झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज आहे. भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि महात्मा गांधींचे विचार संविधानामध्ये होते. हे एक पुस्तक नाही तर तो जगणे आणि मरण्याची शिकवण देतो. संविधानात सर्व धर्माचा आदर, समान अधिकार हेच बोलले आहेत. संघ आणि भाजपचे लोक जेव्हा संविधानावर आक्रमण करतात तेव्हा ते केवळ यावर हल्ला करत नाही तर देशातील कोट्यवधी जनतेच्या आवाजावर हल्ला करतात.
राहूल गांधींचा आरोप… संविधानावर थेट आरोप करू शकत नसल्यामुळे संघाकडून विकास, राष्ट्रवाद शब्दांच्या आड संविधानावर हल्ला केला जातो
संघ आणि भाजपचे लोक जेव्हा संविधानावर आक्रमण करतात तेव्हा ते केवळ यावर हल्ला करत नाही तर देशातील कोट्यवधी जनतेच्या आवाजावर हल्ला करतात. - राहुल गांधी
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-11-2024 at 14:40 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSकाँग्रेसCongressनागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur Newsभारतीय संविधानIndian Constitutionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राहुल गांधीRahul Gandhiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
+ 3 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur samvidhan sammelan rahul gandhi allegations on bjp and rss over constitution dag 87 asj